Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

28 October 2011

दिवाळी स्पेशल-दिवाळीचा बोनस

एक कामचुकार कामगार मालकाला दिवाळीचा बोनस पाहिजे म्हणून मागे लागलेला असतो.


मालक पुणेरी असतो.


मालक कामगाराला बोलावून घेतो आणि म्हणतो, "हे बघ, (तिरसटपणे) तू यावर्षी खूपच मन लावून आणि मेहनतीने काम केले आहेस, म्हणून मी तुला हा ५००० रूपयांचा धनादेश बोनस म्हणून देत आहे."


कामगार धनादेश घेतो आणि आनंदाने निरखून पाहतो. पाहत असताना त्याच्या लक्षात येतं की त्यावर साहेबांची स्वाक्षरी राहिलेली आहे.


कामगार : मालक, यावर तुमची सही राहिलीय.


मालक : अरे घोड्या राहिली नाहीय. तू जर असाच मेहनत करीत राहिलास तर पुढल्या वर्षी मी त्यावर सही करेन.

27 October 2011

दिवाळी स्पेशल-पोपटाचा लिलाव

एक माणूस आपल्या मधुर आवाजात बोलणार्‍या पोपटाचा लिलाव मांडतो.

एकजण येतो आणि बोली लावतो.

हळूहळू बोली वाढत जाते आणि शेवटी तो माणूस हा बोलका पोपट २१०० रुपयांना विकत घेतो.

तो त्या पोपटाच्या मालकाला पुन्हा एकदा विचारून खात्री करतो की हा पोपट खरोखरच बोलतो का हो?

मालक : अहो, बोलतो म्हणजे काय? आता तुमच्याविरुद्ध बोली तोच तर लावत होता.

25 October 2011

दिवाळी स्पेशल-बेवडा


एक बेवडा ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुल्ल टाईट होऊन येतो.

बायको : काय हो, तुम्ही किमान दिवाळीच्या दिवशी तरी पिणार नाही म्हणून वचन दिलं होतंत ना मला सकाळी?

वेबडा : हो, बरोबर आहे. पण मी तरी काय करणार? रॉकेट उडवायला बाटलीच नव्हती ना.

17 October 2011

गिफ्ट

वाढदिवसाला बायको नवर्‍याला विचारते, “काय गिफ्ट आणलंय माझ्यासाठी?”

नवरा : ती समोर उभी असलेली लाल रंगाची गाडी दिसतेय?

बायको : वॉव….


नवरा : त्या रंगाचं नेलपॉलिश आणलंय.

10 October 2011

दिवाळी स्पेशल-माझ्या हाती सत्ता द्या

राहुल गांधी पुण्यात युवक कॉंग्रेसची सभा घेण्यासाठी आलेले असतात. पांढरा शर्ट, गांधी टोपी, पायजमा असा त्यांचा पेहराव असतो.

पुणेकरांना उद्देशून ते म्हणतात, "माझ्या हातात देशाची सत्ता द्या. मी देश बदलून दाखवतो."

नाडकर्णी पुढे येतात आणि म्हणतात, "बाळा, आधी पायजमा बदल. सकाळपासून बघतोय उलटा घालून फिरतोयस."

सरदारजीची मुलाखत-भाग ४


मुलाखतकार : आम्हाला एक जबाबदार व्यक्ती या पदासाठी हवी आहे.

सरदार : हो, हो. मग मला जरूर घ्या तुम्ही.

मुलाखतकार : कसं काय बरं?

सरदार : कारण, आतापर्यंत मी जिथे जिथे काम केलंय तिथल्या बॉसने काही चुका झाल्या की दरवेळी मलाच जबाबदार धरलंय.

अपमान ssss

स्थापत्य अभियांत्रिकीच्या भूगर्भशास्राचा तास चालू असतो.

वर्गात प्रोफेसर बोर्डवर एक मोठा नकाशा लावून हातातील छडीने भारतात आढळणारे विविध खडकांचे प्रकार समजावून सांगत असतात.

एकजण नेहमीप्रमाणे पहिल्या बाकावर बसून झोपलेला असतो.

प्रोफेसर त्याला उठवतात आणि पुढे बोलावतात.

प्रोफेसर त्या मुलाकडे आपल्या हातातील छडीचे एक टॉक करून त्याला उद्देशून इतर मुलांना म्हणतात, "बघा, या छडीच्या एका टोकाकडे. तुम्हाला एक धोंडा दिसतोय ना."

खाली बसलेल्यांपैकी एक विद्यार्थी : कोणत्या टोकाकडे सर?

09 October 2011

तब्येत खराब आहे

संता : काय रे आज तू डॉक्टरांकडे जाणार होतास ना?

बंता : हो, ना. पण आज माझी तब्येत खराब आहे. तेव्हा उद्या जाईन म्हणतो.

08 October 2011

दिवाळी स्पेशल-लिलाव

दिवाळीच्या निमित्ताने लोक नवनवीन वस्तु खरेदी करत असतात.

एकजण असाच दिवाळीच्या मुहूर्तावर कार बाजारात जातो आणि सेकंड हँड कार विकत घेऊन येतो. तीही ८ लाखांना.

मित्र त्याला विचारतात, "काय रे, बाजारात ह्या नव्या कारची किंमत फक्त साडेतीन ते चार लाख असताना तू एवढी दामदुप्पट किंमत देऊन ही जुनी खटारा कार का आणलीस?"

पहिला : अरे मूर्खांनो, ह्या कारची एक खासियत आहे. ह्या कारला आत्तापर्यंत १४ वेळा अपघात झाला आहे.

मित्र : ए शहाण्या, हे तुझ्या बायकोला कळलं ना तर तुझा जीवच घेईल ती.

पहिला : ह्या...ती काय जीव घेणार माझा. तुम्हाला माहीत नाही, ज्या ज्या वेळेला या कारला अपघात झालाय ना, त्या त्या वेळेस फक्त बायकोच मरते आणि नवरा मात्र सही-सलामत वाचतो.

05 October 2011

दिवाळी स्पेशल-नेत्यांचं भाषण

एक नेता दिवाळीचा फायदा घेऊन गर्दी जमलेली दिसली की भाषणं द्यायचा.

पुण्यात असं कुणीही कधीही उठून कुठेही काहीही केलेलं पुणेकरांना अजिबात आवडत नाही.

लोकांनी एका चोकात याचं भाषण चालू असताना त्याला अजिबात दाद दिली नाही की साध्या टाळ्यासुद्धा वाजविल्या नाहीत.

नेता भाषण संपल्यावर संध्याकाळी आपल्या कॉलनीत गेला. तो तिथल्या लोकांना सांगू लागला की आपण कसं जोशात आणि मुद्देसूद भाषण केलं ते.

वर परत म्हणाला, "एवढं चांगलं भाषण करूनही ह्या पुणेकरांनी साध्या टाळ्यापण वाजविल्या नाहीत. मूर्ख, गाढवच आहेत राव सगळे."

तिथे एक पुणेकर आजोबा बसले होते या महाशयांचं बोलणं ऐकत.

ते चटकन म्हणाले, "हो, हो. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तरीच तुम्ही सारखे सारखे म्हणत होतात की माझ्या बंधु आणि भगिनींनो."

03 October 2011

काहीतरी बनायचंय?


दर दिवाळीत घरोघरी मातीचे किल्ले बनवले जातात. अतिहौशी मुलं मग जो किल्ला बनवायचा तो प्रत्यक्षात पाहून येतात. मग जास्तीत जास्त प्रयत्न करतात की आपला किल्ला हुबेहूब कसा बनेल त्याचा.

अशीच ४-५ मुले एका किल्ल्यावर जातात. किल्ला पाहत असतानाच त्यांना पडक्या बुरूजाच्या एका दगडावर काहीतरी लिहिलेलं दिसलं.

जवळ जाऊन पाहिलं तर त्यावर लिहिलं होतं, "हा दगड फिरवून बघा. जादू घडेल आणि तुम्ही काहीतरी बनाल."

या मुलांना न राहवून त्यांनी महत्प्रयासाने तो मोठ्ठा दगड फिरवला.

तर त्याच्या मागे लिहिलं होतं, "बनलात की नाही मूर्ख?"

01 October 2011

दिवाळी स्पेशल-सॉलिड अपमान

दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी.


पण या पहिल्याच दिवशी नवरा बायकोत प्रचंड भांडण होतं.


किचनमधून हॉलमध्ये पलंगावर झोपलेल्या नवर्‍याच्या अंगावर एक एक भांडं येत असतं आणि नवरा आपली कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय असं ते दृश्य असतं.


नवरा समजून चुकलेला असतो की बायकोला समजावण्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं. पण आपणही माघार घ्यायची नाही. आता डोक्यानेच काम घ्यायला हवं.


नवरा किचनमधून येणारे प्रहार चुकवत बायकोकडे जातो आणि एक senti dialogue मारतो.


नवरा : हे प्रिये, तूच माझं आयुष्य आहेस. फक्त तूच माझी जिंदगी आहे.


बायको एका क्षणात खुलते.


बायको : अस्सं??? पुन्हा म्हणा...


नवरा : हे प्रिये, तूच माझं आयुष्य आहेस. फक्त तूच माझी जिंदगी आहे.


बायको : पुन्हा एकदा.


नवरा : हे प्रिये, तूच माझं आयुष्य आहेस. फक्त तूच माझी जिंदगी आहे.


बायको : हम्म, त्याच्यापुढे.


नवरा : त्याच्यापुढे?


बायको : हो, त्यापुढे.


नवरा : त्यापुढे ??? "......थू अशा जिंदगीवर."



बायकोचा मेकअप आणि नवर्‍याचा मेक-अप

नवरा : ए, चल पटापट तयार हो बघू. मी आज पिक्चरची तिकिटे आणलीयेत.

बायको : हे काय? ही तिकीट तर पुढच्या आठवड्यातली आहेत.

नवरा : हो. तुला तयार व्हायला पण वेळ लागतोच ना. गेल्या दोन वेळा नाही का अर्धे पिक्चर पाहावे लागले.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...